E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ग्लेन मॅक्सवेलच्या कृतीवर रितिका संतापली
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
अहमदाबाद : आयसीसी एकदिवसाच्या सामन्यांचा विश्वचषक 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. वर्ल्ड कप 2023 च्या फायलनचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माने तुफानी फलंदाजी केली. मात्र, तो थोडा लवकर बाद झाला आणि 47 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याची पत्नी रितिका सजदेह आणि अनुष्का शर्मा खूपच निराश दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. पण रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन संघाचा फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या जाळ्यात अडकला आणि ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट झेल घेत रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहित शर्मा बाद होताच ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल खूप सेलिब्रेशन करताना दिसला. यानंतर मैदानावर उपस्थित असलेली रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही खूप निराश दिसली आणि रितिकाला ग्लेन मॅक्सवेलचे सेलिब्रेशन आवडले नाही असे दिसून आले.
विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा 30 चेंडूत 47 धावांची खेळी खेळून बाद झाला. रोहित शर्माने आपल्या स्फोटक खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. तर अर्धशतकानंतर किंग कोहली त्रिफळाचित झाला. वृत्त लिहिण्यापर्यंत केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव क्रीझवर फलंदाजी करत आहेत.
Related
Articles
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती
11 Sep 2024
नायजेरियात नौका बुडून ४० शेतकरी बेपत्ता
17 Sep 2024
कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचे भारतीय संघाला आव्हान
17 Sep 2024
जनमत चाचण्यांमुळे महायुतीत अस्वस्थता
17 Sep 2024
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज
16 Sep 2024
...तर इस्रायलचा विनाश निश्चित!
16 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात