E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक पटकावला
Vikrant kulkarni
19 Nov 2023
अहमदाबाद ः
ट्राव्हिस हेडचे शानदार शतक आणि मार्नस लाबूशेनची संयमी नाबाद अर्धशतकी खेळी, मिचेल स्टार्कने घेतलेले तीन महत्त्वपूर्ण बळी आणि तितक्याच सुरेख क्षेत्ररक्षणाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताचा अंतिम सामन्यात 6 बळी राखुन पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक पटकावला. भारताने दिलेले 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखत पार केले. जसप्रीत बुमरा, महमद शमी यांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना लवकर बाद केले. मात्र, हेड आणि लाबूशेन यांनी चौथ्या बळीसाठी तब्बल 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियास विजय मिळवून दिला. तर, सलग दहा सामने जिंकत अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारतास तिसर्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात गेला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरले होते.
भारताने फलंदाजीची जोरदार सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 4 षटकांत 30 धावा फलकावर लावल्या. मात्र, पाचव्या षटकात पहिल्या चेंडूवर मिचेल स्टार्कने अॅडम झॅम्पाकरवी शुभमनला (4) झेलबाद केले. शुभमननंतर विराट मैदानात उतरला. त्याने सातव्या षटकात मिचेलला सलग तीन चौकार लगावले. या दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने शानदार गोलंदाजी करत रोहितला बाद केले. ट्रॅव्हिस हेड याने रोहितचा अप्रतिम झेल पकडला. रोहितने 31 चेंडूत 47 धावा फटकावल्या. यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. राहुलची जागा घेणारा श्रेयस अय्यर अवघ्या तीन चेंडूतच 4 धावा करत तंबूत परतला. अय्यरनंतर के.एल. राहुल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यावेळी भारताची धावसंख्या 10.2 षटकांत तीन बाद 81 होती.
विराट आणि राहुल यांनी संयमी खेळी करताना 17 व्या षटकांत भारताचे शतक पूर्ण केले. 25 व्या षटकात विराटने 56 चेंडूत आपले अर्धशतक झळकविले.
त्यावेळी भारताची धावसंख्या 3 बाद 132 होती. तर, राहुल 25 धावांवर (35 चेंडू) खेळत होता. ही जोडी संयमी खेळ करताना संघाची धावसंख्या 148 असताना विराट 29 व्या षटकांत कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. कमिन्सने विराटचा त्रिफळा उडविला. विराटने 4 चौकारांच्या मदतीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. विराटची जागा रवींद्र जडेजा याने घेतली. त्यावेळी राहुल 65 चेंडूत 35 धावांवर खेळत होता. राहुल आणि जडेजाने संयमी खेळ करताना धावसंख्या धावती ठेवली. राहुलने 86 चेंडूत आपले अर्धशतक झळकवले.
मात्र, 35.5 व्या षटकांत जडेजा हेझलवूडच्या चेंडूवर यष्टिरक्षकाकडे झेलबाद झाला. भारताचा निम्मा डाव 36 व्या षटकात तंबूत परतला. जडेजाने 22 चेंडूत 9 धावा केल्या. जडेजाची जागा सूर्यकुमार यादवने घेतली. दुसरीकडे, राहुलने एक बाजू लावून धरली होती. 42 व्या षटकात भारताला राहुलच्या रुपाने मोठा झटका बसला. स्टार्कने राहुलला यष्टिरक्षक जोश इंग्लिशकरवीे झेलबाद केले. राहुलने 107 चेंडूत 66 धावा केल्या.
राहुलनंतर शमी मैदानात आला. मात्र, तोही फार वेळ मैदानात उभा राहू शकला नाही. स्टार्कने 6 धावांवर शमीला तंबूत धाडले. शमीनंतर बुमरा आला. पण, तोदेखील केवळ उपस्थिती दर्शवत 1 धाव करत तंबूत परतला.
रोहित, विराट आणि राहुलनंतर दोन आकडी संख्या पार केलेला सूर्यकुमार 18 धावांवर बाद झाला. हेझलवूडने त्यास यष्टिरक्षकाकडून झेलबाद केले.
भारताच्या शेवटच्या फलंदाजीच्या टप्प्यात कुलदीप यादव याने 18 चेंडूत 10 धावा केल्या. कुलदीप यादव हा धावचित झाला. तर महमद सिराज हा 9 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. डेविड वॉर्नर 7 धावांवर शमीच्या गोलंदाजीवर कोहलीकडे झेल देत बाद झाला. मात्र त्यानंतर हेड याने 120 चेंडूत 137 धावा तर लबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. स्मिथ 4 धावांत बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद 2 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया :
डेविड वॉर्नर 7,हेड 137,लबुशेन 58,स्मिथ 4,मॅक्सवेल 2 एकूण : 43 षटकांत 241/4
भारत:
रोहित शर्मा 47, शुभमन गिल 4, कोहली 54, श्रेयस अय्यर 4, के.एल राहुल 66, जडेजा 9, सुर्यकुमार यादव 18,शमी 6, बुमरा 1, कुलदीप यादव 10, महमद सिराज 9 एकूण 50 षटकांत 240/10
Related
Articles
मतदानाची यशस्वी सांगता (अग्रलेख)
03 Oct 2024
कच्छ किनार्यावर १२० कोटींचे कोकेन जप्त
08 Oct 2024
संयुक्त राष्ट्राचे काम जुनाट कंपनीप्रमाणे सुरू
07 Oct 2024
सरफराज खानचे झंझावाती द्विशतक, मुंबई ५२५ पार
03 Oct 2024
मोबाईल बनेल‘बॉम्ब’
06 Oct 2024
गुजरातमध्ये भाविकांची बस उलटून तिघांचा मृत्यू
08 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)