पंतप्रधानांच्या सभेसाठी बंदोबस्ताला निघेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात   

पाच पोलिसांचा मृत्यू, तीन जखमी
 
नागौर ः राजस्तानमधील नागौर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात पाच पोलिसांचा मृत्यू झाला. पोलीस कर्मचार्‍यांची भरधाव गाडी मालमोटारीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यात गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. या गाडीतील सर्व पोलीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला जात होते. या अपघातात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी झुंझुनू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  जाहीर सभा होती. नागैरी जिल्ह्यातील खिंवसर पोलीस ठाण्यातील कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी बंदोबस्ताला निघाले होते. दरम्यान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

Related Articles