शेनिस पॅलासिओसने पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब   

नवी दिल्ली ः निकारागुआची शेनिस पॅलासिओस 72 वी मिस युनिव्हर्स ठरली आहे. निकारागुआने प्रथमच आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजय मिळविला आहे. 

एल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर येथील जोस अडोल्फो पिनेड एरिना येथे शनिवारी रात्री ही स्पर्धा पार पडली. पॅलासिओसने 2003 चा ताज पटकवला. 2022 ची मानकरी आर बोनी गाब्रिअल हिने पॅलासिओसला मिस युनव्हर्सचा परिधान केला. थायलंडची अँटोनिया पोर्सिल्ड पहिली रनर अप ठरली. तर, ऑस्ट्रेलियाची मोरया विल्सन दुसरी रनर-अप ठरली.

Related Articles