'धूम’चे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन   

मुंबई : ‘धूम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
गढवी काल सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना त्रास होऊ लागला. त्यांच्या छातीत दुखू लागले आणि घाम आला. त्यांना तातडीने जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गढवी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
गढवी यांनी यशराज फिल्ससाठी धूम (2004) आणि धूम-2 (2006) चे दिग्दर्शन केले होते. तेरे लिए या चित्रपटाच्या माध्यमातून 2000 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण केले.  

Related Articles