E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
"दादा, मी इथे अडकलोय हे आईला सांगू नकोस"
Samruddhi Dhayagude
18 Nov 2023
बोगद्यातील मजुराचा डोळे पाणावणारा संवाद
उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांना वाचवण्याची मोहीम सुरूच आहे. दुर्घटना होऊन काही दिवस झाले असले तरी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यात अद्याप यश आले नाही. या बोगद्यात पुष्कर नावाचा एक मजूर देखील अडकला आहे. पुष्करला त्याचा भाऊ विक्रम सिंहशी बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने "भाऊ, मी इथे अडकलेल्या लोकांपैकी एक आहे हे आईला सांगू नकोस" असे म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,'उत्तरकाशीतील सिल्कयारा बोगद्याचा काही भाग रविवारी कोसळला, आत अडकलेल्यांमध्ये पुष्करचा समावेश आहे. २५ वर्षीय पुष्करने विक्रम सिंहला सांगितलले की, "मी ठीक आहे. इथे इतरही लोक आहेत… तू आईला खरं सांगितलं तर तिला काळजी वाटेल." चंपावत जिल्ह्यातील छनी गोठ गावात राहणारा विक्रम आपल्या भावाशी बोलल्यानंतर रडला.'
"आमच्याकडे बोलण्यासाठी फक्त काही सेकंद होते, म्हणून मी लगेच त्याच्या तब्येतीबद्दल विचारले आणि बाहेर सुरू असलेल्या बचाव कार्याबद्दल सांगितले. लहान असल्याने तो आईचा आवडता आहे" असे विक्रमने सांगितले. मात्र काही शेजाऱ्यांनी अपघाताची माहिती घरी पालकांना दिली आहे. विक्रमच्या म्हणण्यानुसार, अपघाताबाबत समजल्यानंतर पालकांना मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी बोगद्यात अडकलेल्या गब्बर सिंह या मजुराने आपल्या मुलाशी वॉकीटॉकीवरून संवाद साधला आहे. सर्व मजुरांची जबाबदारी माझ्यावर असल्याचे ते म्हणाले. सर्वांना बाहेर काढल्यानंतरच मी बाहेर येईन असेही सांगितले. गब्बर सिंह हे सुपरवायझर आहेत. उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेले गब्बर सिंह नेगी यांनी आपल्या मुलाशी संवाद साधला आणि इतर मजूर सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे पुरेसं अन्न आणि पाणी आहे. आता ते बाहेर येण्याची वाट पाहत आहेत असे म्हणाले.
Related
Articles
कालिंदी एस्प्रेसच्या घातपाताचा प्रयत्न
11 Sep 2024
आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची राहुल यांची मागणी मान्य आहे?
16 Sep 2024
डॉ. रोहित टिळक यांनी पोहचविला सर्वसामान्यांपर्यंत मोदकांचा प्रसाद
14 Sep 2024
अदानी समूह अडचणीत;३१० दशलक्ष डॉलर्स जप्त
14 Sep 2024
वनराज आंदेकर खूनप्रकरणी २१ जणांवर मोक्का
17 Sep 2024
महिला उद्योजकांसाठी पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात