वैज्ञानिक पाहणी अहवालासाठी मागितली मुदतवाढ   

ज्ञानव्यापी प्रकरण

 
वाराणसी : ज्ञानव्यापी मशीद परिसराचा वैज्ञानिक पाहणी अहवाल सादर करण्यासाठी भारतीय पुरातत्व पाहणी (एएसआय) विभागाने शुक्रवारी  वाराणसी न्यायालयाकडे आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.
 
यासंदर्भात केंद्र सरकारतर्फे वकील अमित श्रीवास्तव यांनी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्‍वेश यांच्यासमोर अर्ज दाखल केला आहे. ज्ञानव्यापी मशीद परिसराची वैज्ञानिक पाहणी पूर्ण झाली असली तरी तांत्रिक अहवालांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला असल्याची श्रीवास्तव यांनी सांगितले.  याआधी, 2 नोव्हेंबर रोजी वाराणसी न्यायालयाने भारतीय पुरातत्व पाहणी विभागाची (एएसआय) विनंती स्वीकारताना पाहणी अहवाल सादर करण्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंतची वेळ दिली होती. 

Related Articles