अल्पवयीन मुलाने मोटार भरधाव चालवून वाहनांना उडवले   

पुणे : भावाला न सांगता घरातील मोटार घेऊन रस्त्यावर आलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार चालवून वाहनांना उडवल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या भरधाव मोटारीने रस्त्यावरून जाणार्‍या चार ते पाच वाहनांना उडवले. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, पोलिसांनी मोटार चालवणार्‍या आणि त्याच्या शेजारी बसलेल्या अल्वयीन मुलाला ताब्यात घेतले.
 
वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलाने त्याच्या भावाला न सांगता पार्किंगमध्ये लावलेली मोटार बाहेर काढली आणि रस्त्यावर आणली. त्यानंतर, त्याने भरधाव वेगाने मोटार चालवून धनकवडी येथील सावरकर चौकात एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तो वेगाने मोटार चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 
 
त्यावेळी तेथे रस्त्याने जाणार्‍या काही वाहनांना धडक देत, सातारा रस्ता, बालाजीनगर परिसरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी स्थानिक नागरिकांंनी पाठलाग करून त्याला गाठले. त्यानंतर, त्याला मोटारीतून खाली खेचून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Related Articles