भारताला कमी धावांत बाद करू : मार्श   

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी विश्‍वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याबाबत अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आणि भाकित येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज मिचेल मार्श याने तर रोहित शर्मा आणि भारताला थेट इशाराच दिला आहे. विश्‍वचषकात भारतीय संघाला फक्त 65 धावांवर झटपट बाद करु, असे मिचेल मार्श याने म्हटले. त्यानंतर मार्शची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दिल्ली कॅप्टिलच्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना मिचेल मार्श याने एका प्रकारे भारताला लवकर गारद करू असे म्हटले आहे. 
 
ऑस्ट्रेलियाच्या विश्‍वचषकाच्या अभियानाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. भारताकडून त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आफ्रिकेनेही त्यांची दयनिय अवस्था केली होती. त्यानंतर श्रीलंकेचा पराभव करत त्यांनी विजयी सुरुवात केली. साखळी सामन्यात भारताने कांगारुचा पराभव केला होता. उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ चाचपडताना दिसला. 213 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची पुरती भंबेरी उडाली होती. पॅट कमिन्स अन् मिचेल स्टार्क यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळला होता. या सामन्यात मार्शला खातेही उघडता आले नव्हते. पण भारताविरोधात होणार्‍या अंतिम सामन्याआधी त्याने हुंकार भरली आहे. 
 

ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार : मिशेल मार्श

 
भारताचा पराभव करत आम्ही अजेय राहू, असे मार्श म्हणाला. अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया दोन बळीच्या मोबदल्यात 450 धावा करेल. प्रत्युत्तरदाखल भारत फक्त 65 धावांत सर्वबाद  होईल.  मिचेल मार्श याने विश्‍वचषकात सरासरी कामगिरी केली आहे. त्याने एका शतकाच्या मदतीने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. उपांत्य सामन्यामध्ये मिचेल मार्श याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. तरीही त्याने आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलिया विश्वचषकावर नाव कोरेल, असे म्हटले आहे. 
 

Related Articles