अंतिम सामन्यासाठी ‘सूर्यकिरणची‘प्रात्यक्षिके   

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्‍वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या रणांगणात हे दोन संघ भिडणार आहे. सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणारा सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सामन्याआधी खास वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. भारतीय वायुसेनाची ‘सूर्यकिरण‘ नावाची टीम हवाई प्रात्यक्षिके करणार आहे. जवळपास दहा मिनिटांपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे मैदानामध्ये असणार्‍या प्रेक्षकांसाठी ही मेजवानीच असेल. या हवाई प्रात्यक्षिकांसाठी वायूदलाचा जोरदार सराव सुरु आहे.
 
रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. रोहितच्या संघासमोर आता पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवला. 
 

रोषणाईने झगमगणार मैदान

 
अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेगवेगळ्या प्रकारची  रोषणाई केली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. रोषणाई सोबतच संपूर्ण मैदानामध्ये ठिक ठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे गाण्यांसोबतच समालोचनही चाहत्यांना ऐकता येणार आहे. 
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महामुकाबला पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय भारताचा माजी कर्णधार, विश्‍वचषक विजेता कर्णधार धोनीही अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. अहदाबादमध्ये सध्या सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैणात करण्यात आली आहे. एमएस धोनीसह अनेक दिग्गज खेलाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय राजकीय नेतेही उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.
 

Related Articles