संपूर्ण भारतीय संघाला विजयाचे श्रेय : रोहित शर्मा   

मुंबई : भारताचा फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात 50 वे शतक पूर्ण केले. रोहीत शर्मा याने कालच्या सामन्यातील मोठ्या धावसंख्येविषयी बोलताना सर्वांना या सामन्याच्या विजयाचे श्रेय दिले. तो म्हणाला की, सगळे एकत्रित खेळल्याने भारताला विजय गवसला. आणि इतकी मोठी धावसंख्या उभारता आली. संपूर्ण संघाने केलेल्या एकत्रित मेहनतीला याचे श्रेय जाते. 
 
रोहितने सुरुवातच दणक्यात करून दिली होती. त्यानंतर गिलने पण चांगली लय पकडली होती. श्रेयसचे शतक, के. एल, राहुलने जबरदस्त पद्धतीने फिनिश केलेली इंनिंग सगळे काही सर्वोत्तम होते. त्यामुळेच आम्ही जवळपास 400 चा टप्पा गाठू शकलो. विराट कोहलीला त्याच्या 50 व्या शतकानंतर कसे वाटत आहे  असे विचारले असता कोहली म्हणाला की, माझ्यासाठी भारतीय संघ जिंकणे आवश्यक आहे मग मी त्यासाठी वाटेल ते करेन, मला यंदा विश्‍वचषकात संघाकडून ज्या पद्धतीने खेळण्याचे आदेश मिळाले आहेत मी त्याच पद्धतीने खेळतो. भारताला सध्या मी चांगले खेळावे  असे वाटत आहे. मग मी तसेच खेळणार. मी खेळपट्टीवर टिकून राहून इतरांना खेळायची संधी द्यायचा प्रयत्न करत आहे. मी आता इतरांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण शेवटी संघ जिंकणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, भारत विरुद्ध न्यझीलंड सामन्यातील कोहलीचे ं शतक हे त्याच्या खात्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले शानदार शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर 29 तर 20- 20 प्रकारात एका शतकाची नोंद आहे. 2009 मध्ये विराटने एकदिवसांच्या सामन्यांच्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. 14 वर्षानंतर विराटने वनडे शतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहली व श्रेयस अय्यरचे शतक, गिलची 80 धावांची खेळी याच्या बळावर भारताने 398 धावांचे लक्ष्य दिले आहे. 
 

Related Articles