आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर नाराज   

कोलकाता : आयसीसीच्या एकदिवसाच्या सामन्यांचा विश्‍वचषक हा आफ्रिका संघ आणि डेव्हिड मिलरसाठी फारसा चांगला गेला नाही. त्याने आपल्या संघासाठी खेळलेल्या 9 साखळी सामन्यांमध्ये निराशा केली. तसेच कालच्या उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला. त्यानंतर आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर हे नाराज झाले. त्यांनी आपण आगामी अंतिम सामना पाहणार नसल्याचे सांगितले. काल पुन्हा एकदा आफ्रिका ऑस्ट्रेलियाकडून हरल्याने आफ्रिकेचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. 
 
या 9 साखळी सामन्यांमध्ये त्याने फक्त एकदाच अर्धशतक झळकावले होते. त्याने पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध 53 धावांची इनिंग खेळली, पण उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याचबरोबर डेव्हिड मिलरने आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो विश्‍वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. डेव्हिड मिलरने आपल्या खेळीत 116 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 5 षटकार लगावत 101 धावा केल्या. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाला 200 धावांचा टप्पा पार करता आला. दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्वबाद 212 धावा केल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याचा निर्णय योग्य ठरला नाही आणि एका क्षणी संघाने 24 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या.  त्यानंतर पाचव्या बळीसाठी डेव्हिड मिलरने हेनरिक क्लासेनसोबत 95 धावांची भागीदारी केली, मात्र 119 धावांवर क्लासेन 47 धावा करून बाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेची ही पाचवा बळी ठरला. यानंतर लगेचच 119 धावांवर संघाची सहावा बळी पडला आणि यान्सेन शून्यावर बाद झाला, पण मिलरने खंबीरपणे उभे राहून कांगारू गोलंदाजांचा चांगला सामना केला.डेव्हिड मिलनरने या सामन्यात कांगारू संघाविरुद्ध संयमाने फलंदाजी करत 115 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे या विश्‍वचषकातील पहिले शतक होते तर एकदिवसाच्या विश्‍वचषकातील त्याचे दुसरे शतक होते. एकदिवसाचा विश्‍वचषक स्पर्धेत त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिले शतक झळकावले होते.
 
या सामन्यात त्याने 116 चेंडूंचा सामना करताना 5 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. या दरम्यान डेव्हिड मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी बाद फेरीत शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. डेव्हिड मिलरने 8 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषकात आपले दुसरे शतक झळकावण्यात यश मिळवले, तर त्याचे एकदिवसाच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिलरचे वनडे कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते. मिलर आता आयसीसी बाद फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू झाला आहे. त्याने फाफ डू प्लेसिसचा (82 धावा) विक्रमही मोडला.
 

Related Articles