मुंबईत इमारतीला आग   

मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या 8 व्या आणि 12 व्या मजल्यावर शुक्रवारी आग लागली. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी 15 व्या, 21 व्या आणि 22 व्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. त्यांना जिन्यातून सुरक्षितपणे टेरेसवर हलवले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
ऑगस्ट क्रांती रस्त्यावरील धवलगिरी  इमारतीच्या आठव्या आणि बाराव्या मजल्यावर काल सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सदनिकांतील फर्नीचर, वायरिंग आणि दरवाजे जळून खाक झाले, असेही अधिकार्‍यांनी सांगितले
 

Related Articles