केरळ बॉम्बस्फोटातील बळींची संख्या ६ वर   

कोची : कोचीतील कालामस्सेरी येथील ख्रिश्‍चन धर्मियांच्या झामरा आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या बॉम्बस्फोटातील बळींची संख्या 6 वर पोहोचली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली.मलयातूर येथील रहिवासी प्रवीण (वय 24) यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, असे रुग्णालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.
 
प्रवीण यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.प्रवीणच्या आईचा 11 नोव्हेंबर रोजी तर बहिण लिबिना हिचा 30 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. 29 ऑक्टोबर रोजी बाँबस्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात 50 हून अधिक जण जखमी झाले होते. 

Related Articles