आतापर्यंत 11 हजार 470 पॅलेस्टिनींचा मृत्यू, 2700 हून अधिक बेपत्ता   

खान युनिस (गाझा पट्टी) : इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीत 11 हजार 470 पॅलेस्टिनी मारले गेले असून, 2700 हून अधिक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 4707 अल्पवयीन आणि 3155 महिला आहेत. इस्रायली सुरक्षा दलांनी पॅलेस्टिनींना दक्षिण गाझाच्या काही भागातून निघून जाण्याचा इशारा देणारी पत्रके टाकली आहेत. त्यामुळे इस्त्रायल दक्षिण गाझामध्येही मोठा हल्‍ला करण्याच्या तयारीत असल्याचे  सांगण्यात येत आहे.
 
इस्रायलने दक्षिणेकडील मोहिमेचा विस्तार केला आहे. जिथे ते दररोज हवाई हल्ले करत आहेत. गाझामध्ये 1.5 दशलक्षाहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. त्यापैकी बहुतेक दक्षिणेकडे पळून गेले आहेत. या भागात अन्न, पाणी आणि विजेची टंचाई वाढत असून, लाखो नागरिक त्रस्त आहेत. इजिप्तने निर्वासितांना आपल्या देशात घेण्यास नकार दिल्याने त्यांना इतरत्र कुठेही जाण्याचा मार्ग नाही. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झाले होते, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी 1200 हून अधिक लोकांची हत्या केली होती आणि 240 लोकांना बंदी बनवले होते.
 

गाझामध्ये दूरसंचार सेवा कोलमडली

 
इंधनाच्या कमतरतेमुळे गाझामधील सर्व दळणवळण सेवा कोलमडली आहे.  ज्यामुळे इस्रायली सैन्याने वेढा घातलेल्या परिसरात लँडलाइन, मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्या आहेत.  
 

Related Articles