गॅस सिलिंडर ५७ रुपयांनी झाला स्वस्त   

नवी दिल्ली : दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असताना तेल कंपन्यांनी आज, गुरुवार, १६ नोव्हेंबर 2023 रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत.१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत थोडासा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी (OMCs) किंमत 57.50 रुपयांनी कमी केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
 
दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.नवीन बदलानंतर, १९ किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 1755.50 रुपये, कोलकात्यात 1885.50 रुपये, मुंबईत १७२८ रुपये आणि चेन्नईमध्ये १९४२ रुपये प्रति सिलेंडर आहे.
 

घरगुती सिलेंडरची किंमत?

 
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये प्रति सिलेंडर आहे. दिवाळीच्या आधी म्हणजेच १ तारखेला व्यावसायिक सिलिंडरचे दर 101.50 रुपयांनी वाढले होते. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
 

Related Articles