शमीच्या गोलंदाजीचे पंतप्रधानांनी केले कौतुक   

दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेचा उपांत्य फेरीचा पहिला सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.
 
हा सामना जिंकत भारताने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे अभिंनंदन केले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर)वर लिहिले की, आजचा उपांत्य फेरीतील शानदार वैयक्तिक प्रदर्शनामुळे आणखी खास ठरला. मोहम्मद शमीने केलेली भेदक गोलंदाजी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवली जाईल.
 
भारतीय संघाचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की,'' भारताने शानदार प्रदर्शन केले आणि दिमाखदार पद्धतीने अंतिम फेरीत प्रवेश केला. धमाकेदार फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघासाठी अंतिम फेरीत स्थान निश्चित झाले. अंतिम सामन्यासाठी खुप खुप शुभेच्छा. 
 

Related Articles