जगातील सर्वात वेगवान इंटरनेट चीनमध्ये लाँच!   

एका सेकंदात शंभर पेक्षा जास्त एचडी मूव्हीज डाऊनलोड होतील 
 
बीजिंग : चीनमधील तंत्रज्ञान सध्या झपाट्याने प्रगती करत आहे. यातच चीनमध्ये आता जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. या इंटरनेटचा स्पीड एवढा जास्त आहे, की एका सेकंदात सुमारे १५० एचडी चित्रपट ट्रान्सफर करता येतील. देशातील काही शहरांमध्ये ही सेवा सुरू केली आहे.
 
या इंटरनेटचा स्पीड हा '५ जी' च्या तुलनेत जास्त आहे. 5G इंटरनेटचा स्पीड हा साधारणपणे 20 GBPS (20 गिगाबाईट्स प्रति सेकंद) एवढा असतो. तर चीनमध्ये सुरू केलेल्या नव्या इंटरनेटचा स्पीड हा तब्बल 1.2 TBPS, म्हणजेच 1200 गिगाबाईट्स प्रति सेकंद एवढा आहे.
 
शिंघुआ युनिवर्सिटी, चायना मोबाईल, हुआवे टेक्नॉलॉजीस आणि सर्नेट कॉर्परेशन या चार कंपन्यांनी मिळून या इंटरनेट प्रकल्पावर काम केले आहे. जगातील सर्वात प्रमुख वेगवान इंटरनेट सेवांच्या तुलनेत या इंटरनेटचा वेग कमीत कमी १० पटींनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. जगातील कित्येक इंटरनेट सेवा या केवळ 100 GBPS एवढ्या वेगाने इंटरनेट देतात. तर अमेरिकेतील सर्वात वेगवान इंटरनेट देखील 400 GBPS एवढाच स्पीड देते.
 

या शहरांमध्ये उपलब्ध

 
हे वेगवान इंटरनेट नेटवर्क तब्बल 3,000 किलोमीटर भागात पसरले आहे. यासाठी ऑप्टिकल फायबर केबल्सचा वापर केला आहे. बीजिंग, वुहान आणि गुआंगजो या शहरांमध्ये हे नेटवर्क पसरले आहे. हे नेटवर्क जुलैमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, याच्या इतर चाचण्या सुरू होत्या. अखेर सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सोमवारी त्याची अधिकृत प्रदर्शन करण्यात आले.
 

Related Articles