E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विराटाचे शतक होताच सचिन केला गौरव
Samruddhi Dhayagude
16 Nov 2023
मुंबई : भारत न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने अखेर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक म्हणजेच ५० शतके पूर्ण केली. एकेकाळी मास्टर-ब्लास्टरचा सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम मोडणे हा अशक्य मानला जाणारा विक्रम विराटने कमी डावांमध्ये मोडीत काढला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. विराटने शतक झळकावल्यानंतर ते कसे सेलिब्रेट केले
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात विराटने ५०वे शतक झळकावताच विराटने शानदार पद्धतीने आपले शतक साजरे केले. त्याने दोन धावा घेत उडी मारत तो थेट जमिनीवर बसला आणि स्टेडियममध्ये चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. सगळेच विराटच्या या शतकी खेळीने आनंदित झाले होते तर खुद्द सचिन तेंडुलकरही मनापासून आनंदी दिसला आणि हात वर करत टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहन दिले. विराटनेही सर्वात आधी स्टेडियममध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरसमोर मान झुकवून आपला आदर दर्शवला. सचिन तेंडुलकर विराट कोहलीसाठी क्रिकेटमधील देव आहे आणि तो त्याला प्रचंड मानतो.
सचिननंतर त्याने पत्नी अनुष्काला फ्लाइंग किसही दिला. भारतीय डाव संपल्यानंतर, त्याच्या या अर्धशतकाबद्दल विराट म्हणाला, 'मला सध्या काय बोलावे ते समजत नाही. पुन्हा एकदा त्या महान व्यक्तीने (सचिन तेंडुलकर) माझे अभिनंदन केले. हे खरोखर स्वप्नासारखे आहे. आमच्यासाठी हा मोठा सामना होता आणि मी माझी भूमिका चोख बजावली. मी आधी म्हटल्याप्रमाणे, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा संघ जिंकतो हे आहे. संघाने मला या स्पर्धेत भूमिका दिली आहे आणि मी तेच करत आहे. नियमित कामगिरी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परिस्थितीनुसार खेळणे आणि संघासाठी खेळणे.'
पुढे विराट म्हणाला, "सचिन तेंडुलकर तिथे स्टँडवर हजर होते. तो क्षण व्यक्त करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. माझी जोडीदार आणि माझे आदर्श आज इथे उपस्थित आहेत आणि वानखेडेवर बरेच क्रिकेट चाहते उपस्थित होते. हा क्षण कधीही न विसरता येणारा क्षण आहे.'
काय म्हणाला सचिन आपल्या ट्विटमध्ये
विराटने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतले हे ५० वं शतक झळकावलं आहे. या शतकानंतर सचिन तेंडुलकरने विराटचे कौतुक केले. एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडीत काढणं, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. यावेळी त्यांनी तरुण विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधल्या पहिल्या दिवसाची आठवण सांगितली आहे.
‘एक्स’ खात्यावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकर विराटला उद्देशून म्हणाला, “जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा आपल्या संघातील इतर खेळाडूंनी तुझी फिरकी घेतली आणि माझ्या पायाला स्पर्श करायला लावलं. त्या दिवशी मला हसू आवरता आलं नाही. पण लवकरच, तू तुझ्या क्रिकेटच्या अप्रतिम कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा आज ‘विराट’ खेळाडू झाला आहे. याचा मला खूप आनंद आहे.”
“एका भारतीय खेळाडूने माझा विक्रम मोडला, यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही. हे शतक विश्वकपसारख्या मोठ्या स्पर्धेत, उपांत्य फेरी सामन्यात आणि माझ्या घरच्या मैदानावर आलं आहे, त्यामुळे हे सोन्याहून पिवळं आहे,” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.
विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे.
Related
Articles
वीजपुरवठ्याचे कंत्राट मिळताच अदानी समूहाचे समभाग उसळले
17 Sep 2024
लष्करी अधिकार्यासह मैत्रिणींना मारहाण
13 Sep 2024
व्हॉट्सऍप कट्टा
15 Sep 2024
जयदीप आपटे याच्या पोलिस कोठडीत वाढ
11 Sep 2024
आदिती-सिद्धार्थ यांनी बांधली लग्नाची गाठ
17 Sep 2024
पाकिस्तानात मंकीपॉक्सचे पाच रुग्ण
16 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात