जम्मूमध्ये बस दरीत कोसळली, ३० जण ठार   

दोडा : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. जम्मूहून किश्तवाडला जाणारी बस दरीत कोसळून ३० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. बसमधील बरेच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरीत कोसळलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. या बसमधून ५५ जण प्रवास करत होते. जम्मूवरून किश्तवाडला जात असताना बस दोडाजवळ पोहोचली. या भागात खूप उंचावर आणि वळणा वळणाचे रस्ते आहेत. त्याच दरम्यान बस दरीत कोसळली.
 
काही जखमी प्रवाशांना दोडा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात तर काहींना किश्तवाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Articles