ऐन दिवाळीत दिल्लीत ५२५ कोटींची मद्यविक्री   

दिल्ली : देशभर दिवाळी सण उत्साहात साजरा होत आहे. ऐन दिवाळीच्या काळात दिल्लीकर मद्य खरेदीत गुंग होते. कारण २०२२ च्या तुलनेत यावर्षी जवळपास दुप्पट मद्यविक्री झाल्याचा तपशील समोर आला आहे. दिल्लीकरांनी दिवाळीपूर्वीच दारूचा साठा केल्याचे यातून समोर येते. 
 
उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १८ दिवसांत तब्बल ३.०४ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल ५२५.८४ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी याच काळात २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती.
 
दिवाळीच्या दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी (१० नोव्हेंबर) १८,८९,९६९ बाटल्या विकल्या गेल्या. मागील वर्षी हा आकडा १५,०४,००० इतका होता. गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी १९,३९,४९४ बाटल्यांची विक्री झाली होती. या तुलनेत शनिवारी (दिवाळीच्या १ दिवस आधी) तब्बल २७,८३,१७५ मद्याच्या बाटल्यांची विक्री झाली आहे.
 
या संदर्भात माहिती देताना उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,''सध्या सणासुदीचा हंगाम आणि ‘ड्राय डे’ असल्यामुळे या काळात मद्याची विक्री वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत सामान्यतः 'ड्राय डे' मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे, या काळात सरासरी दारुची विक्री वाढते.
 

Related Articles