भारतीय शेअर बाजारात घसरण   

मुंबई : मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी घसरला. महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान आणि ग्राहक विषयक आणि आर्थिक समभागात गुंतवणूक करणारे सावधगिरीने पावले टाकत आहेत. त्याचे परिणाम शेअर बाजारात दिसले.
लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी विशेष मुहूर्ताचे सौदे शेअर बाजारात  झाले होते. तेव्हा  सेन्सेक्स निफ्टी वाढले होते.  पण, काल शेअर बाजारात समभागांची घसरण झाली. सेन्सेक्स दिवसअखेर 406.09 ने घसरून तो 46 हजार 853.36 वर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 ने घसरून 19 हजार 443.55 वर बंद झाला.   बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, नेस्तले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग घसरले. महिंद्रा अँड महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, पॉवर ग्रीड आणि इंडसलँड बँकेचे समभाग वाढले.

Related Articles