पिनाराई विजयन यांच्या विरोधातील अर्ज फेटाळला   

तिरुवनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांनी मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करणारा अर्ज फेटाळला. लोकायुक्त न्यायमूर्ती सिरियाक जोसेफ आणि उपलोकायुक्त न्यायमूर्ती बाबू मॅथ्यू पी जोसेफ आणि हारुण-उल-रशीद यांच्या समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा अर्ज फेटाळला.
 
तक्रारदार आर. एस. शशीकुमार यांनी केलेल्या अर्जावर हा निकाल देण्यात आला. शशीकुमार यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पदाचा गैरवापर करत  मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधी हडपला. ते  भ्रष्टाचार, पक्षपात आणि घराणेशाहीमध्ये गुंतलेले आहेत. 
 

2019 मध्ये लोकायुक्तांनी स्वीकारली तक्रार

 
लोकायुक्तांनी जानेवारी 2019 मध्ये तक्रार स्वीकारली होती. शशीकुमार यांच्या तक्रारीत राष्ट्रवादीचे नेते दिवंगत उज्वूर विजयन, माकपचे माजी आमदार दिवंगत के. सत्ताधारी सीपीआयचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांच्याही नावाचा उल्लेख होता.

Related Articles