पाकिस्तानात मसूद अझहरच्या साथीदाराची हत्या   

कराची : पाकिस्तानात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना रहीम उल्लाह तारिक यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. तो जैशचा प्रमुख मसूद अझहरचा साथीदार होता. 
 
तारिक हा पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना होता. त्याला ऐकण्यासाठी हजारो लोक जमायचे. कराचीच्या ओरंगी टाऊनमध्ये भारतविरोधी फेरीत सहभागी होण्यासाठी जात असताना कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पाकिस्तानात एकामागून एक दहशतवादी मारले जात आहेत. अलीकडेच खैबर पख्तूनख्वामधील बाजौरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम गाझी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचा भारताविरुद्ध दहशतवादी कट रचण्यात सहभाग होता. 2018 ते 2020 या काळात नव्या दहशतवाद्यांच्या भरतीचे काम त्यांनी पाहिले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सततच्या हत्यांमुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची झोप उडाली आहे. गेल्या महिन्यात भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ पाकिस्तानमध्ये मारला गेला होता. शाहिद लतीफ यांची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 2016 मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा शाहीद लतीफ मास्टरमाईंड होता. 
 

Related Articles