जयशंकर यांची दिवाळी सुनक दांपत्याबरोबर   

लंडन :  ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षदा यांच्यासोबत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सपत्निक सोमवारी दिवाळी साजरी केली. 
जयशंकर यांच्या ब्रिटन दौर्‍यानिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन सुनक यांनी केले होते. त्यात जयशंकर यांनी पत्नी क्योको यांच्यासमवेत भाग घेतला. जयशंकर यांनी सुनक दांपत्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि ब्रिटनचे संबंध अधिकाधिक वाढावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. अशा प्रकारची पोस्ट एक्सवर टाकली आहे. सुनक दांपत्याच्या आदरातिथ्यामुळे मी आणि माझी पत्नी भारावून गेलो. दोन्ही देशांत चांगले संबंध निर्माण व्हावेत, या दृष्टीकोनातून जयशंकर ब्रिटनच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत.

Related Articles