टिम स्कॉट यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार   

वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार टिम स्कॉट यांनी रविवारी रात्री उशिरा 2024 च्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतल्याची घोषणा केली.  
 
दक्षिण कॅरोलिनाचे सिनेटर स्कॉट यांनी ट्रे गौडी यांच्यासोबत ’संडे नाईट इन अमेरिका’ या टीव्ही कार्यक्रमात ही घोषणा केली. आयोवाच्या लीडऑफ कॉकसमध्ये मतदान सुरू होण्याच्या दोन महिने आधी त्यांनी ही घोषणा केली.कृष्णवर्णीय असलेले स्कॉट मे महिन्यात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत उतरले होते.
 
स्कॉट म्हणाले, मला अमेरिकेवर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम आहे. पण जेव्हा मी आयोवाला परतेन, तेव्हा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून परत येणार नाही. मी माझा निर्णय मागे घेत आहे. मला वाटते की, मतदार मला याबद्दल सूचित करत आहेत की, सध्या तुमची योग्य वेळ नाही.  
 

Related Articles