जपानचे उपअर्थमंत्री केंजी कांडा यांचा राजीनामा   

टोकियो : कंपनी आणि इतर मालमत्तेवर निश्चित मालमत्ता कर भरण्यात अयशस्वी ठरलेले जपानचे उपअर्थमंत्री केंजी कांडा यांनी राजीनामा दिला आहे. अर्थमंत्री शुनिची सुझुकी यांच्याकडे सोपविण्यात आलेला राजीनामा सरकारने मंजूर केला आहे.
 
जी कांडा यांच्यावर मालमत्ता कर चुकवल्याचा आरोप होता. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार केंजी कांडा यांनी कबूल केले आहे की,स्थावर मालमत्ता कर न भरल्याबद्दल कर अधिकार्‍यांनी 2013 ते 2022 या कालावधीत चार वेळा त्यांच्या कंपनीची जमीन आणि मालमत्ता जप्त केली होती. शुकन बनशुन साप्ताहिक अहवालात आरोप केल्यानुसार, कर लेखापालांसाठी अनिवार्य असलेल्या वार्षिक ताळेबंदांच्या वेळी ते उपस्थित राहिले नाहीत. मी राष्ट्रीय राजकीय घडामोडींमध्ये व्यस्त होतो. मागणी पत्रे आणि इतर बाबी कर लेखापाल कार्यालयातील कर्मचार्‍यांवर सोडल्या होत्या. दरम्यान, कांडा यांच्या अर्थमंत्रालयातील या भूमिकेबद्दल विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. 

Related Articles