रिषभ पंतने साजरी केली धोनीसोबत दिवाळी   

रांची : सध्या देशभरात दिवाळी सण साजरा केला जात आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यानेही ही दिवाळी आपला आदर्श आणि भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत दिवाळी साजरी केली. दोन्ही यष्टीरक्षक फलंदाज यावेळी खास पारंपरिक पेहरावात दिसले. 
 
याबाबत धोनीची पत्नी साक्षी धोनी हीदेखील उपस्थित होती. साक्षी यावेळी स्टायलिश क्रीम रंगाच्या सूटमध्ये दिसत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाल्यानंतर पंत अनेकदा धोनीसोबत दिसला आहे. यावेळी त्याने धोनीसोबत दिवाळी सण साजरा केला. साक्षीने तीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिषभ पंत, एमएस धोनी आणि साक्षी यांच्याव्यतिरिक्त त्यांचे इतर मित्र आणि नातेवाईकही दिसत आहेत. या फोटोंवरून असे दिसते की, हे फोटो रांची येथील धोनीच्या घरामधील आहेत. हे फोटो शेअर करत साक्षीने खास कॅप्शनही दिले. तिने लिहिले की, आमच्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

पंत लवकरच मैदानावर परतणार

 
रिषभ पंत मागील वर्षा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्याला आपले गुडघे आणि घोट्याची सर्जरी करावी लागली होती. यानंतरपासून तो एनसीएमध्ये पुनरागमनसाठी प्रयत्न करत आहे. अपघातानंतर पंत क्रिकेटपासून बराच काळ दूर राहिला. मात्र, पुढील वर्षी जानेवारीपर्यंत तो मैदानावर परतण्याची आशा आहे.
 

Related Articles