आयसीसीच्या ’हॉल ऑफ फेम’मध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश   

नवी दिल्ली : विश्वचषकाच्या उपांत्या सामन्याआधी आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. दोन भारतीय खेळाडूंना सर्वात मोठा सन्मान देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तीन दिग्गज माजी खेळाडूंचा ’हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. यामध्ये दोन भारतीय खेळाडू आहेत. एक स्त्री आणि एक पुरुष त्याचबरोबर श्रीलंकेच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश झाला आहे. टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आयसीसी हॉल ऑफ फेम सन्मान प्रदान करण्यात आला आहे. 
 

भारतीय महिला क्रिकेटपटूचा प्रथमच समावेश

 
भारताची माजी कर्णधार डायना एडुल्जी यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्याने त्या हा सन्मान स्विकारणार्‍या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. एडुल्जी भारतीय महिला संघाच्या कर्णधार होत्या आणि नंतर क्रिकेट प्रशासकही झाल्या. या सन्मानानंतर डायना एडुल्जी यांनी आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीमध्ये म्हटले की, ’हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनणे हा सन्मान आहे. 
 

Related Articles