E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वायनाडमधील बळींची संख्या १५८ वर
Samruddhi Dhayagude
01 Aug 2024
१९१ जण अद्याप बेपत्ता
वायनाड/तिरुवनंतपुरम : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी दरड दुर्घटनेतील बळींची संख्या १५८ वर पोहोचली आहे. तर, अद्याप १९१ जण बेपत्ता आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी बुधवारी दिली.या दुर्घटनेत २०० हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत, ५,५९२ जणांना वाचविण्यात आले आहे. तर, लहान मुले आणि गर्भवती महिलांसह ८,०१७ नागरिकांनी ८२ शिबिरात आश्रय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
शेकडो जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढू शकतो, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.मंगळवारी पहाटे मुंडक्काई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझा गावात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामध्ये महिला आणि मुलांसह अनेकांना जीव गमवावा लागला.मुंडक्काई आणि चूरलमला गावातील १८० जण बेपत्ता असून ३०० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आतापर्यंत १४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये ७९ पुरूष आणि ६४ महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह मोपड्डी आरोग्य केंद्र आणि निलांबूर सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
लष्कर, हवाई दल आणि एनडीआरएफचा समावेश असलेली बचाव पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झालेल्या किंवा ढिगार्याखाली अडकलेल्या जिवांना वाचविण्याचे काम ते करत आहेत.लष्कराच्या जवानांनी एक हजारांहून अधिक जणांना वाचविले असल्याचे संरक्षण विभागाने सांगितले. मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. चार गावे साखरझोपेत असताना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. बुधवारी सकाळी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले. पण, खराब हवामान आणि पावसामुळे व्यत्यय येत होता. अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. तर, काही पूल तुटले होते. त्यामुळे, आवश्यक साहित्य घेऊन जाताना बचाव पथकांना कसरत करावी लागत होती.
वायनाडमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नजर ठेवून आहेत. केंद्र सरकारने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन केरळ सरकारला दिले आहे, असे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी सांगितले. कुरियन यांनी काल वायनाडमधील बाधितांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. गृह मंत्रालयाचे दोन्ही नियंत्रण कक्ष देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले.
Related
Articles
प्रा. साईबाबा यांचे निधन
14 Oct 2024
नॉन क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस केंद्राला करणार
11 Oct 2024
निर्यातबंदी उठल्यामुळे तांदळाच्या दरात वाढ होणार
08 Oct 2024
सणसवाडीत पुणे-नगर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
10 Oct 2024
शांततेचे नोबेल जपानच्या संस्थेला अण्वस्त्रांना प्रखर विरोधाची दखल
12 Oct 2024
वाचक लिहितात
14 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
फाजील आत्मविश्वास भोवला