आता ‘आर-पार’ची लढाई   

मुंबई, (प्रतिनिधी) : आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय काय डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. आता होऊनच जाऊ दे, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान देत ‘आर-पार’ची लढाई सुरू केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. या टीकेमुळे भाजप नेतेही बिथरले असून, त्यांनी टीकेचा भडिमार सुरू केला आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाने काल मुंबईतील रंगशारदा सभागृहात शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. उद्धव  यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदी व फडणवीस यांच्यावर टीका केली. 

Related Articles