पुण्यातील २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या   

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी काढले आदेश 

पुणे : शहर पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी रात्री काढले.पोलीस निरीक्षकाचे नाव (पूर्वीचे ठिकाण, बदलीचे ठिकाण) :- 
शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणी काळभोर ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), स्वप्नाली शिंदे (डेक्कन ते सायबर गुन्हे शाखा), राजेंद्र मगर (लष्कर ते आर्थिक गुन्हे शाखा), दीपाली भुजबळ (विश्रामबाग ते आर्थिक गुन्हे शाखा), आनंदराव खोबरे (विमानतळ ते गुन्हे शाखा), विश्वजित काईंगडे (खडक ते नियंत्रण कक्ष), अजय कुलकर्णी (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा), शैलेश संखे (चतु:श्रृंगी ते गुन्हे शाखा), संतोष सोनवणे (कोंढवा ते वाहतूक शाखा), महेश बोळकोटगी (मुंढवा ते वरिष्ठ निरीक्षक चतु:शृंगी), विनय पाटणकर (बिबवेवाडी ते वरिष्ठ निरीक्षक कोंढवा), गिरीश दिघावकर (खडकी ते वरिष्ठ निरीक्षक लष्कर), मंगल मोढवे (हडपसर ते वरिष्ठ निरीक्षक बिबवेवाडी), राजेंद्र करणकोट (वानवडी ते वरिष्ठ निरीक्षक लोणी काळभोर), सतीश जगदाळे (डेक्कन ते वरिष्ठ निरीक्षक खडकी), संतोष खेतमाळस (खडक ते वरिष्ठ निरीक्षक खडक), विजयमाला पवार (चतु:श्रृंगी ते वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग), निळकंठ जगताप (वारजे माळवाडी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा), अजय संकेश्वरी (वाहतूक ते वरिष्ठ निरीक्षक विमानतळ), गिरीषा निंबाळकर (शिवाजीनगर ते वरिष्ठ निरीक्षक डेक्कन).

Related Articles