मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी   

पुणे : मुळशीतील शेतकर्‍याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणार्‍या व सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज गुरुवारी सुनावणी होणार आहे.
 
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह सातजणांविरोधात पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांनी शेतकर्‍याला पिस्तुलाचा धाक दाखवला होता. त्यामुळे त्यांच्यावर पौंड पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा खेडकर यांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महाड परिसरातून अटक केली. दिलीप खेडकर यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनोरमा खेडकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, सध्या त्या येरवडा कारागृहात आहेत. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी झाली नाही. आता मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Related Articles