सर्वाधिक पदके जिंकणार्‍या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर   

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकला  सुरुवात झाली आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती. यंदा पॅरिस येथे होणार्‍या या स्पर्धेत भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. भारताला गत ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदा चांगल्या कामगिरीची आशा आहे. गेल्या टोयो ऑलिम्पिकमध्ये भारताला नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके कुणी जिंकली आहेत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वाधिक पदके जिंकणार्‍या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. अमेरिका पदक जिंकण्यात सर्वात आघाडीवर आहे. अमेरिकेच्या जवळपास देखील दुसरे देश नाहीत.
 
अमेरिकेने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक १०६५ सुवर्णपदके अमेरिकेच्या नावावर आहेत. एक हजारांपेक्षा अधिक सुवर्णपदके जिंकणारा अमेरिका एकमेव देश आहे. याशिवाय त्यांनी ८३५ रौप्य आणि ७३८ कांस्य पदकं जिंकली आहेत. अमेरिकेच्या नावावर २६३८ पदके आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्यामध्ये दुसर्‍या क्रमांकावर रशिया आहे. रशियाने आतापर्यंत १०१० पदके जिंकली आहेत

Related Articles