लोवलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीत   

पॅरिस : भारताची मुष्टीयोद्धा लोवलिना बोरगोहेन हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये उपांत्यपुर्व फेरीत मजल मारली आहे. आता पदक मिळविण्यासाठी तिला फक्त एका विजयाची गरज आहे.लोवलिना हिने नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफसटेड हिच्याविरुद्ध विजय मिळविला. लोवलिना हिने ५-० असे गुण मिळवत हा सामना जिंकला. 
 
आता भारतासाठी लोवलिना ही कोणते पदक मिळविते हे पहाणे महत्त्वाचे आहे. जागतिक मुष्टीयोद्ध स्पर्धेत लोवलिना हिने आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तसेच तिने टोकिओ ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी घातली होती. आता तिला तिचा आगामी सामना हा चीनची मुष्टीयोद्धा ली क्वीन हिच्या विरुद्ध खेळायचा आहे. यावर्षी लोवलिना ही अत्यंत आत्मविश्वासाने कामगिरी करत आहे. 

Related Articles