दिल्लीमध्ये धावल्या ३२० इलेक्ट्रिक बस   

प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचे पाऊल

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी ३२० इलेट्रिक बस धावल्या. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इलेट्रिक बससेवा सुरू केली आहे. नायब राज्यपाल व्ही. के. ससेना यांनी बसना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यामुळे दिल्ली परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील इलेट्रिक बसची संख्या १ हजार ९७० झाली आहे.इलेट्रिक बससेवेमुळे दिल्लीत प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल. दिल्ली सरकारच्या सहकार्याने  भविष्यात असे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास ससेना यांनी व्यक्त केला. 
 
राज्याचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने इलेट्रिक बससेवा प्रदान करणारे दिल्ली देशातील पहिले आणि जगातील तिसरे शहर बनले आहे. दिल्ली वाहतूक महामंडळाच्या ताफ्यात एकूण ७ हजार ६८३ बस असून त्यापैकी १ हजार ९७० इलेट्रिक असून उर्वरित सीएनजीवरील आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेवेळी परिवहन महामंडळाकडे ५ हजार ५०० बस होत्या. त्या तुलनेत बसची संख्या आता वाढली असल्याचे ते म्हणाले. सुखदेव विहार, कालकाजी अणि नरैना बसस्थानकातून त्या मार्गस्थ होणार आहेत. २५ टके सीसीटीव्हीने सुसज्ज असतील. उर्वरित बसमध्ये यंत्रणा बसविली जाणार आहे. २०२५ पर्यंत ८० टके अर्थात एकूण १० हजार ८४० इलेट्रिक बस ताफ्यात सामील करण्याचे नियोजन आहे.

Related Articles