जागतिक गुंतवणुकीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या   

पंतप्रधान मोदी यांचे उद्योजकांना आवाहन 

नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उद्योजकांनी ही सुवर्णसंधी गमावू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. गुंतवणुकीचा ओघ वाढल्यास देशांतर्गत उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यत केला. विकसित भारताच्या दिशेने प्रवास या विषयावर सीआयआयने अंदाजपत्रकानंतर परिषद आयोजित केली होती. तेव्हा मोदी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील सरकारकडे राजकीय इच्छशतीची त्रुटी नाही. देश प्रथम याप्रमाणे निर्णय घेण्याची क्षमता सरकारकडे आहे. देशाचा विकास दर ८ टके आहे. त्यामुळे एके दिवशी भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते म्हणाले, अंदाजपत्रकात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पावले उचलली आहेत. 

Related Articles