E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नदीकाठ सुधार योजना म्हणजे मेकअप : आदित्य ठाकरे
Samruddhi Dhayagude
31 Jul 2024
पुणे : नदीकाठ सुधार योजना म्हणजे केवळ मेकअप असून, यात मुळा-मुठा नदीचे सिमेंटचे बकेट तयार केले जात आहे, अशी टिका शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. हा प्रकल्प रद्द करणे गरजेचे असून, सर्वच पक्षांनी संवेदनशीलपणा दाखवित एकत्रितपणे या प्रकल्पावर विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या आठवड्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सिंहगड रस्ता भागातील पूरबाधित भागाला भेट दिली. तेथे नागरीकांशी चर्चा केली. यानंतर पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी नदीकाठ सुधार योजनेतील त्रुटी आणि त्याचे परिणाम याविषयावर भाष्य केले. यावेळी पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी सादरीकरण करून नदीकाठ सुधार प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प, अतिक्रमणे यामुळे मुठा नदीची वहन क्षमता कमी झाल्याचा दावा केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन आहिर, शहर प्रमुख गजानन थरकुड, संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, वसंत मोरे आदी उपस्थित होते.
पत्रकार परीषदेत आदित्य ठाकरे यांनी यादवाडकर यांनी केलेल्या सादरीकरणाचा उल्लेख करीत, नदीकाठ सुधार प्रकल्पाविषयी भुमिका स्पष्ट केली.
आमचा विकास कामांना विरोध नाही असे नमूद करीत, आदीत्य ठाकरे म्हणाले, "या प्रकल्पाचा कंटूर स्टडी केला पाहिजे. जगात कोठेही नदीसंदर्भात काम करताना नदीची खोली वाढविली जाते, तसेच तिची रुंदी वाढविली जाते. पण पुण्यात मात्र उलटेच होत आहे. या नदीतील पाणी आधी स्वच्छ करणे गरजेचे असताना, तीचे ब्युटीफिकेशन करण्याच्या नावाखाली केवळ मेक अप केला जात आहे. पुण्यात पात्र अरुंद केले जात असल्याने नदी ही सिमेंटचे बकेट होणार आहे, भविष्यात अशा पुरांचा धोका निर्माण होईल.”सदर प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी, या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून, प्रतिष्ठीत नागरीकांकडून विरोध केला जात आहे. राज्य सरकार यांचे म्हणणे न ऐकता हा प्रकल्प पुण्यावर लादत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?
* पुण्यातील नद्या आणि गुजरात मधील साबरमती यांच्या भौगोलिक रचनेत मोठा फरक
* महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना या प्रकल्पाला स्थगिती दिली होती.
* प्रकल्पाच्या तांत्रिक बाजू सर्व पक्षाच्या नेत्यांना समजून सांगणे आवश्यक
* नाले आणि डोंगरमाथा- डोंगरउतारावरील बांधकामासंदर्भात संवेदनशीलपणे विचार करून ठोस मार्ग काढणे गरजेचे
* मुंबई तुंबू नये यासाठी केलेल्या उपाययोजनांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
* सदर प्रकल्पाच्या आर्किटेटने जेथे जेथे काम केले तेथे तेथे पूरस्थिती निर्माण झाली.
* क्लायमेट अॅशन प्लॅनच्या अंमलबजावणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष.
Related
Articles
ब्रिटनच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी
14 Sep 2024
हिमनदी वितळल्याने भूकंपाचे धक्के !
14 Sep 2024
पाकिस्तानात पुन्हा पोलिओ लशीकरण कर्मचार्यांवर गोळीबार
13 Sep 2024
भारतातील आरोग्य कर्मचार्यांना क्षयरोगाचा सर्वाधिक धोका
08 Sep 2024
दिल्लीत व्यायामशाळेच्या मालकाची गोळीबारात हत्या
14 Sep 2024
पालिकेकडून बंद सीसीटीव्ही कॅमेर्यांची दुरुस्ती सुरू
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन