E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज्यात ८१ हजार कोटींच्या सात उद्योगांना मंजुरी
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंगळवारी सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून कोकणसह मराठवाडा व विदर्भात ८१ हजार १३७ कोटी गुंतवणूक होणार असून, सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. काल मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पांत उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेट्रील व्हेईकल, सेमीकंडटर चिप, फळांचा पल्प निर्मिती आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम आयन सेल/बॅटरी, इलेट्रीकल व्हेईकल, सेमीकंडटर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेट्रोलायझर, फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उद्योगांना राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असून, औद्योगिक धोरणानुसार सामुहिक प्रोत्साहन योजनेतंर्गत विविध प्रोत्साहने जाहिर करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
संभाजीनगरला हायब्रीड वाहन निर्मिती प्रकल्प
जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी छत्रपती संभाजीनगरला इलेट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, ५,२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
या प्रकल्पामध्ये वर्षाला ५ लाख इलेट्रीक प्रवासी मोटार व १ लाख व्यावसायिक मोटार निर्मिती होणार आहे.आरआरपी इलेट्रॉनिस कंपनीमार्फत सेमीकंडटर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा, पनवेल येथे उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमीकंडटर निर्मिती करणारा प्रकल्प आहे. याप्रकल्पामध्ये प्रथम टप्यात १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार असून ४,००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसर्या टप्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होणार आहे. याशिवाय जेएसडब्ल्यु एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण २५ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. ५,००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे.
हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प रत्नागिरी येथे होणार आहे. १,५०० कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे.आवाडा इलेट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा (ता. पनवेल जि. रायगड) या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे.
Related
Articles
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
10 Oct 2024
ऐन सणासुदीत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले
10 Oct 2024
स्मृती मंधानाचे अर्धशतक
10 Oct 2024
राष्ट्रवादीचे बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन
14 Oct 2024
भारत-लाओसमध्ये सीमाशुल्क, संरक्षण महामंडळ करार
12 Oct 2024
आसाममध्ये सव्वा लाख तरुणांना सरकारी नोकर्या
08 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
5
वाचक लिहितात
6
फाजील आत्मविश्वास भोवला