E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वायनाडमध्ये निसर्गाचे तांडव!
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
दरड कोसळून १२३ ठार; शेकडो जण ढिगार्याखाली
वायनाड, (केरळ) : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात मंगळवारी पहाटे निसर्गाने अक्षरशः तांडव घातला! मुसळधार पावसामुळे काही गावांवर दरड कोसळल्याने १२३ जणांचा मृत्यू झाला. तर, शेकडो जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. भारतीय लष्करासह नौदल आणि एनडीआरएफचा समावेश असलेली बचाव पथके मदत कार्यात गुंतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रौद्र रुप धारण केलेल्या पावसाने देशात अनेकांचे बळी घेतले आहे. वायनाडमध्ये झोपेत असलेल्या अनेकांना काल मृत्यूने कवेत घेतले.लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी दरड कोसळल्याने ७० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे संसदेत सांगितले.दरड कोसळल्याची घटना समोर येताच युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. मात्र, खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत ७० जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, असे जिल्हाधिकारी मेघश्री डी.आर यांनी सांगितले.वायनाडच्या चूरलमला येथील दुर्घटनेत सर्वाधिक ३६ जणांचा बळी गेला. तर, मलप्पुरममध्ये चालियार नदीत वाहून गेलेले नऊ मृतदेह सापडले आहेत.
मृतांचे मृतदेह ओळख आणि शवविच्छेदनासाठी विविध रुग्णालयांतील शवागारात नेण्यात येत आहेत. मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा गावांना पावसाचा मोठा फटका बसला.काल पहाटेच्या सुमारास मेप्पाडीच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या मालिका सुरू झाल्या. या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, हे सांगणे तूर्तास अशय आहे, असे सूत्रांनी सांगितले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असून, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संवाद साधतानाच, केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
बाधित भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल, राज्य पोलिस, वन, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेेची पथके युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहेत. सरकारी यंत्रणेसह स्थानिक रहिवासी आणि स्वयंसेवकही या कामात गुंतले आहेत, असे जिल्हाधिकारी मेघश्री यांनी सांगितले.
दोन दिवसांचा दुखवटा
केरळ सरकारने राज्यात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकणार असून राज्य सरकारचे सर्व अधिकृत कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. केरळचे मुख्य सचिव डॉ. व्ही. वेणू यांनी याबाबतची माहिती दिली.पहाटे २ ते ६ च्या सुमारास चार गावे वाहून गेली. मुंडक्काई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा येथे घरे, पूल, रस्ते आणि वाहनेही वाहून गेली. पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये याच गावात अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर, ५२ घरे उद्ध्वस्त झाली होती. मुंडक्काई गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे. बचाव पथक अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही. एनडीआरएफचे एक पथक पायी चालत येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. पण, कालची रात्र अशी जीवघेणी ठरेल, याची कोणी कल्पनादेखील केली नव्हती. मध्य रात्रीच्या सुमारास पावसाने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात चिखलासह मलबा आला. यामध्ये अनेक घरे गाडली गेली. रात्रीची वेळ आणि धो-धो कोसळणारा पाऊस, यामुळे अनेकांना काही कळण्याच्या आतचे मृत्यूने कवेत घेतले. अनेक रस्ते खचल्याने गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बाधित गावामध्ये सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डोंगरावरील मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे.
लष्कर आणि एनडीआरएफची पथके
वायनाड : केरळ सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराची मदत मागितली होती. त्यानुसार, भारतीय लष्कराचे पथक वायनाड जिल्ह्यात दाखल झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथकेदेखील येथे दाखल झाली आहेत. बचावकार्यासाठी हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर्सही दाखल झाली आहेत, असे राज्याचे महसूल मंत्री के. राजन यांनी सांगितले.मुंडक्काईच्या दिशेने एनडीआरएफचे पथक रवाना झाले असून कोल्लम, अरकोनम आणि बंगळुरु येथील एनडीआरएफची तीन पथके लवकरच दाखल होतील, असेही ते म्हणाले. मुंडक्काईमध्ये हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. या गावाकडे जाणारा पूल उद्ध्वस्त झाला आहे. बचाव पथकासाठी तात्पुरता पूल उभारला जात आहे, असेही राजन यांनी सांगितले.या घटनेत किती हानी झाली, हे आताच सांगणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. कोझिकोडमधील विविध रुग्णालयात आतापर्यंत ७० जणांना दाखल करण्यात आले आहे.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतानाच परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाला भेट दिली. यासोबतच, युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले.
Related
Articles
अनिवासी भारतीय पतीकडून महिलेचा छळ
08 Sep 2024
स्टारलाइनची कुपी पृथ्वीच्या दिशेने
08 Sep 2024
बांगलादेशातील पूरग्रस्तांसाठी सिंगापूरची मदत
09 Sep 2024
कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरण चौैघांना हंगामी जामीन
14 Sep 2024
व्हॉट्सऍप कट्टा
09 Sep 2024
अजय-अतुल यांच्या गीतांवर तरूणाईने धरला ठेका
12 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
समर्पित डॉक्टर!
3
॥गणेशपूजनाची परंपरा॥
4
‘धारावी’चे रूपडे पालटणार?
5
‘फॅब 4’मधे सर्वोत्तम
6
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन