सद्दाम हुसेनसारखे हाल करू   

तुर्कीच्या धमकीनंतर इस्रायलचा इशारा 

जेरूसलेम : हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ले करत असतानाच तुर्कस्ताननेही इस्रायलला हल्ल्याची धमकी दिली आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इस्रायलला लष्करी कारवाईची धमकी दिली. यानंतर इस्रायलने एर्दोगन यांचे हाल इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यासारखे करू, असा इशारा  दिला आहे.इस्रायलचे कट्टर विरोधक मानले जाणारे एर्दोगन यांनी पॅलेस्टाइनवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांना कडाडून विरोध केला आहे. पॅलेस्टाइनवरील हल्ले आता आपण पाहू शकत नाही, गरज पडल्यास इस्रायलवर हल्ला करू अशी इशारावजा धमकी त्यांनी दिली. त्यावर  इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्स म्हणाले की, एर्दोगन सद्दाम हुसेन यांच्या मार्गावर चालत आहेत. इराकमध्ये काय घडले आणि सद्दाम हुसेन यांच्यासोबत काय झाले ते लक्षात ठेवावे. एर्दोगन यांना इस्लामिक देशांचे नेते व्हायचे आहे आणि म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत; पण आम्ही घाबरणार नाही.
 
एर्दोगन आपल्या पक्षाच्या बैठकीत म्हणाले होते की, आपण अत्यंत मजबूत व्हायला हवे. जेणेकरून इस्रायल पॅलेस्टाइनसोबत हास्यास्पद गोष्टी करणार नाही. आपण ज्यापद्धतीने काराबाखमध्ये प्रवेश केला होता, ज्या पद्धतीने लिबियावर चढाई केली होती, तसे करू शकतो. अशी पावले उचलण्यासाठी आपल्याला मजबूत राहावे लागेल.  

Related Articles