E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मादुरो विजयी घोषित
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
काराकस : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र, विरोधी पक्षनेते अनियमिततेचा आरोप करत निकालाला विरोध करण्याच्या तयारीत आहेत.व्हेनेझुएलामध्ये रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मध्यरात्रीनंतर नॅशनल इलेटोरल कौन्सिलने सांगितले की, मादुरो यांना ५१ टक्के मते मिळाली, तर विरोधी पक्षाचे प्रमुख उमेदवार एडमुंडो गोंजालेज यांना ४४ टक्के मते मिळाली. मदुरो समर्थकांच्या नियंत्रणाखालील निवडणूक प्राधिकरणाने अद्याप ३० हजार मतदान केंद्रांवरील मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे विरोधकांना
निकालाची पुष्टी करता आलेली नाही.
निवडणूक परिषदेने येत्या काही तासांत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याने परदेशी नेत्यांनी अद्याप निकालाला मान्यता दिलेली नाही. चिलीचे नेते गॅब्रिएल बोरिक म्हणाले, मादुरो सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, त्यांनी प्रकाशित केलेल्या निकालांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी टोकियोमध्ये सांगितले की, त्यांच्या देशाला या घोषणेबद्दल गंभीर चिंता आहे. अखेर मादुरो निकालाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेर आले तेव्हा त्यांनी अज्ञात परदेशी शत्रूंवर मतदान प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या विजयाच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे दिले नाहीत; परंतु व्हेनेझुएलामध्ये हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणार्यांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले.
विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, त्यांनी मतदान केंद्रांवर गोळा केलेल्या आकडेवारीवरून गोंजालेज मादुरो यांचा पराभव करीत असल्याचे दिसून येते. दरम्यान, येत्या काही तासांत मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर करणार असल्याचे निवडणूक परिषदेच्या प्रमुखांनी सांगितले.राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना तिसर्यांदा गोंजालेज यांच्याकडून कडवे आव्हान आहे. विरोधी पक्षनेत्यांना गोंजालेज यांच्या विजयाची खात्री होती आणि त्यांनी काही मतदान केंद्रांबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.
Related
Articles
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
बीसीसीआय श्रेयस अय्यरबरोबर महत्त्वपुर्ण करार करणार
15 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
15 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)