E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
भाजप नेत्यांचे स्वागत भोवले; दोघांचे निलंबन
Samruddhi Dhayagude
30 Jul 2024
भोपाळ : मध्य प्रदेशात एका भाजप नेत्याचे स्वागत करणे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच भोवले. कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे स्वागत केल्याप्रकरणी इंदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरजीत चढ्ढा आणि ग्रामीण अध्यक्ष सदाशिव यादव यांचे निलंबन करण्यात आले आहे. संघटन प्रभारी राजीव सिंह यांनी ही कारवाई केली आहे.
एक पेड माँ के नाम मोहिमेत काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि इतर भाजप नेते इंदूरमधील जिल्हा काँग्रेस कार्यालयात गेले होते. यावेळी विजयवर्गीय यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यावरून राजीव सिंह यांनी या दोन नेत्यांना नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर मागितले आहे.
नोटीसमध्ये लिहिले आहे की, एक असा व्यक्ती, ज्याने माता अहिल्याच्या नगरीत लोकशाही मूल्यांची हत्या केली. इंदूरच्या जनतेकडून मतदानाचा हक्क काढून घेऊन त्यांनी इंदूरची देश-विदेशात बदनामी केली, ज्याचा इंदूरच्या जनतेने निषेधही केला. अशा व्यक्तीचे इंदूर जिल्हा काँग्रेस कमिटीने गांधी भवनात स्वागत करणे हे अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येते. तुम्ही सात दिवसांत याचे स्पष्टीकरण द्या. या कालावधीत तुम्हाला तुमच्या सध्याच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.
Related
Articles
भांडवली बाजार नाराज
02 Feb 2025
चौथे आगाखान यांचे निधन
06 Feb 2025
पंचायत समिती उमेदवाराची कुर्हाडीने हत्या
08 Feb 2025
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर बलाढ्य विजय
02 Feb 2025
२०२७ मध्ये चांद्रयान-४ मोहीम
07 Feb 2025
‘आप’च्या आमदारांना १५ कोटींचे आमिष
07 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक
6
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’