जम्मूमध्ये बस उलटली; ३१ जखमी   

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भरधाव वेगातील बस उलटली. या अपघातात बसमधील ३१ प्रवासी जखमी झाले असून, १३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना अखनूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त बस मैरा मंद्रियांहून अखनूरकडे जात होती. भरधाव वेगातील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खुग्गा वळणाजवळ उलटली. २२ प्रवाशांची क्षमता असलेल्या या छोट्या बसमध्ये ३५ प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी जखमींना तात्काळ अखनूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 
 
अखनूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ऑफिसर मोहम्मद सलीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ प्रवाशांना जखमी अवस्थेत अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी १३ गंभीर जखमींना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.
 
दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये अपघात झाला होता. अनंतनाग जिल्ह्यातील किश्तवाड येथील रहिवासी इम्तियाज राथेर किश्तवाडहून सिंथन टॉप मार्गे मारवाहकडे जात होता. त्यावेळी त्याची मोटार घसरून खड्ड्यात पडली. या अपघातात पाच मुले आणि दोन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

Related Articles