‘रिलायन्स’ जिओ डाटा वापरात जगात अव्वल   

वृत्तवेध 

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आता डेटावापराच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. मुकेश अंबानींच्या कंपनीने चिनी कंपन्यांना मागे टाकत जगातील पहिल्या क्रमांकाच्या कंपनीचा मान पटकावला आहे.‘जिओ’च्या तिमाही निकालात ही बाब समोर आली आहे. ‘जिओ’ नेटवर्कवरील डेटाचा वापर या तिमाहीमध्ये ४४ हेझाबाइट्स म्हणजेच ४४०० कोटी जीबीच्या वर गेला आहे. ‘रिलायन्स जिओ’कडे ४९ कोटी रुपये ग्राहक आहेत. त्यातच गेल्या वर्षी चार कोटी ग्राहक ‘जिओ’मध्ये सामील झाले आहेत. ‘जिओ’डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी हा विक्रम चिनी कंपन्यांच्या नावावर होता.
 
कंपनीकडून सांगण्यात आले, की ‘जिओ’ ग्राहकांचा दरडोई डेटा वापर दरमहा ३०.३ जीबीपर्यंत वाढला आहे. म्हणजेच प्रति दिन एक जीबीपेक्षा जास्त. जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार, ‘जिओ’चा डेटा वापर ३२.८ टयांनी वाढून ४४ अब्ज गिगाबाइट्स झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये ते ३३.२ अब्ज गिगाबाइट होते. ‘जिओ’च्या फाईव्हजी ग्राहकांची संख्या किती मोठी आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो. चीनला वगळले तर ही संख्या जगातील सर्वात मोठी आहे. ‘जिओ’च्या एकूण ग्राहकांची संख्या जवळपास ४९ कोटींवर पोहोचली आहे. ‘जिओ’चे १३ कोटी ५जी वापरकर्ते आहेत. डेटा वापराच्या बाबतीत जिओ जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे, तर ५ जी सेवांच्या बाबतीत चीनपेक्षा फक्त एक पाऊल मागे आहे.

Related Articles