बोपण्णा, बालाजीचा पराभव;भारताचे टेनिसमधील आव्हान संपुष्टात   

पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान एकेरी आणि पुरुष दुहेरीत सुमित नागलच्या रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी या जोडीचा पहिल्या फेरीत पराभव झाल्याने टेनिसमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
 
बोपण्णा आणि बालाजी यांना एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन आणि गेल मॉनफिल्स या फ्रेंच जोडीकडून ५-७, २-६ असा पराभव पत्करावा लागला. मॉनफिल्सने अखेरच्या क्षणी जखमी फॅबियन रेबोलच्या जागी घरच्या संघात स्थान मिळवले होते. बोपण्णाची ही शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. ४४ वर्षीय बोपण्णा डेव्हिस चषकातून याआधीच निवृत्त झाला आहे.

Related Articles