E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
महात्मा गांधींचा संदेश आजही प्रभावी : जयशंकर
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
टोकियोत पुतळ्याचे अनावरण
टोकियो : जगभरात संघर्ष वाढत आहेत, प्रचंड तणाव आणि ध्रुवीकरण आहे, रक्तपात होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींचा संदेश आपणाला लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये रणांगणातून शांतता नांदू शकत नाही आणि हे युद्धाचे युगही नाही, हा महात्मा गांधींचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे, जितका तो ८० वर्षांपूर्वी होता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
एस. जयशंकर दोन दिवासांच्या जपान दौर्यावर आहेत. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. दौर्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी टोकियोतील एडोगावा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले, एडोगावा वॉर्डने भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा अप्रतिम पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील लोक गांधीजींना राष्ट्रपिता मानतात. पण, जगासाठी तो खर्या अर्थाने जागतिक आयकॉन आहे. रणांगणातून उपाय निघत नाहीत आणि कोणतेही युग हे युद्धाचे युग नसावे हा महात्मा गांधींचा चिरंतन संदेश आजही जगाला लागू आहे. त्यांचा दुसरा संदेश शाश्वतता, हवामान अनुकूलता, हरित विकास, हरित धोरणांच्या संदर्भात आहे. गांधीजी हे शाश्वत विकासाचे मूळ प्रेषित होते.
महात्मा गांधी हे निसर्गाशी एकरूप राहण्याचे सर्वात मोठे समर्थक होते. म्हणून गांधीजींचा संदेश केवळ सरकारांसाठी नाही, तर प्रत्येकाने तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वीकारला पाहिजे. ही अशी गोष्ट आहे जी आपण पुढील पिढ्यांकडे पाठवतो. गांधींशिवाय भारताला स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असता किंवा कदाचित वेगळ्या मार्गावर गेला असता, असेही ते म्हणाले.
Related
Articles
क्ले मॉडेलिंग स्पर्धेत उलगडली गणरायाची विविध रूपे
09 Sep 2024
महिलांवरील गुन्ह्यांबाबत भाजपचा दृष्टिकोन नकारात्मक
13 Sep 2024
वाचक लिहितात
09 Sep 2024
शिवसेना आपल्या घरी...
11 Sep 2024
कोमोरोस बेट समूहाच्या अध्यक्षांवर चाकू हल्ला
15 Sep 2024
डॉ. रोहित टिळक यांनी पोहचविला सर्वसामान्यांपर्यंत मोदकांचा प्रसाद
14 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
4
कल्याणकारी योजनांच्या श्रेयासाठी रस्सीखेच
5
सुमधुर गीतांनी रंगली ‘नाट्य भक्तिरंग’ मैफल
6
काश्मीरमधील निवडणूक (अग्रलेख)