E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनमध्ये दरड कोसळून १५ ठार; ६ जखमी
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
बीजिंग : चीनच्या हेंगयांग शहरातील युलिन गावात रविवारी सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. ढिगार्याखाली १८ जण गाडले गेले होते. बचाव पथकाने ढिगार्याखालून १५ जणांचे मृतदेह बाहेर काढले. तर सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास २५० जवान घटनास्थळी बचावकार्यात गुंतले आहेत. मुसळधार पावसामुळे चीनच्या उत्तर आणि नैऋत्य भागात अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. गॅमी वादळातून येणार्या चक्रीवादळामुळे येथे मुसळधार पाऊस झाला. मात्र, पावसामुळे पुराच्या धोयामुळे चीनच्या अनेक भागात आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
या वादळामुळे तैवानमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. कोहसियुंग भागात झाड कोसळून ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर हुआलियन शहरात घराचे छत कोसळून एका ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.याच भागात दरड कोसळून एका ७८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे चक्रीवादळामुळे झालेल्या घटनांमध्ये विविध भागात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
पूरग्रस्त भागातून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. कुओ नावाचा एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. दुसर्या एका घटनेत चीनच्या शांघायमध्ये वादळामुळे झाड कोसळून कंपनीच्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला.
Related
Articles
कोको गॉफ विजेती
08 Oct 2024
‘खिळे मुक्त झाडे’ उपक्रमाने गांधी जयंती साजरी
04 Oct 2024
मराठीच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर
07 Oct 2024
अति आत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव : केजरीवाल
09 Oct 2024
सरफराज खानचे झंझावाती द्विशतक, मुंबई ५२५ पार
03 Oct 2024
पावणेदोन कोटींचे शुध्द सोने चोरुन कारागीर पसार
08 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)