E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शिखर परिषदेत सहभाग टाळा; चीनचा सहा देशांवर दबाव
Samruddhi Dhayagude
29 Jul 2024
बीजिंग : तैवानमध्ये होणार्या चीनकेंद्रित शिखर परिषदेला उपस्थित राहू नये, यासाठी चीन सहा देशांच्या नेत्यांवर दबाव टाकत आहेत. बैठकीला उपस्थित राहण्याच्या तयारीत असलेल्या एका देशाच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना ही माहिती दिली.बोलिव्हिया, कोलंबिया, स्लोव्हाकिया, उत्तर मॅसेडोनिया, बोस्निया आणि हर्जेगोविना या देशांच्या नेत्यांवर चीन दबाब टाकत आहे. त्यांना तैवानला भेट न देण्याबद्दल चीनकडून फोन आणि मेसेज येत आहेत. या नेत्यांनी चीनच्या या कृतीचे वर्णन स्वशासित बेटाला एकटे पाडण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
तैवानमधील चीनकेंद्रित शिखर परिषदेला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. इंटर पार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना या ३५ देशांच्या शेकडो खासदारांच्या गटाने या परिषदेचे आयोजन केले आहे. लोकशाही देश बीजिंगला कसा प्रतिसाद देतात, याची चिंता या गटाला आहे.तैवानला पाठिंबा दर्शविणार्या नेत्यांना आणि देशांना प्रत्युत्तर देण्याची धमकी चीन अनेकदा देत असतो. तैवान हा आपला वाटा असल्याचा त्यांचा दावा आहे.चीन आणि तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.चीनवरील आंतरसंसदीय आघाडीला चीन सरकारच्या दबावाला बराच काळ सामोरे जावे लागत आहे. बीजिंगने आपल्या काही सदस्यांवर निर्बंध लादले आहेत.
Related
Articles
अभिनव भारतचे संस्थापक : बाबाराव सावरकर
06 Sep 2024
गाझावरील हवाई हल्ल्यात १२ पॅलेस्टिनींचा मृत्यू
08 Sep 2024
लांडग्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी
04 Sep 2024
महिला शास्त्रज्ञ वडिलांसह पुरात वाहून गेली
05 Sep 2024
बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या २०५ घटना
06 Sep 2024
खेळाडूंनी जास्तीत जास्त सुवर्ण पदके मिळवावी : मनसुख मांडविया
08 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमेरिकेत मंदीची चाहूल?
2
महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश झाल्यास ते रद्द करणार
3
फोगट, पुनिया यांनी घेतली राहुल यांची भेट
4
न्यायालयाचे ऐकणार कोण?(अग्रलेख)
5
सचिन खिलारीला रौप्यपदक
6
‘स्त्री’ला बळ मिळेल का?(अग्रलेख)