नेताजींच्या अस्थी भारतात आणा; चंद्र कुमार बोस यांची मागणी   

कोलकाता : आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी १८ ऑगस्टपर्यंत जपानमधील रेन्कोजी येथून भारतात आणाव्यात, अशी मागणी नेताजी यांचे खापरपणतू चंद्र कुमार बोस यांनी केली आहे. या प्रकरणी केंद्र सरकारकडून अंतिम निवेदन आले पाहिजे, जेणेकरून नेताजींविषयीच्या खोट्या बातम्यांना पूर्णविराम मिळेल, असेही ते म्हणाले.एनडीए सरकारने स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित फायली सार्वजनिक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व १० चौकशी जाहीर झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमधील विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारत सरकारकडून अंतिम निवेदन येणे आवश्यक आहे, जेणेकरून खोट्या बातम्यांना आळा बसेल.नेताजींच्या अस्थी रेंकोजी मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत, हे अत्यंत अपमानास्पद आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहीत आहोत की, भारताच्या स्वातंत्र्यवीराचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या अस्थी भारतीय भूमीत यायला हव्यात. नेताजींची कन्या अनिता बोस फाफ यांना हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करायचे आहेत. भारत सरकारने उत्तर द्यायला हवे, असेही बोस यांनी रविवारी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Related Articles